Surprise Me!

Narendra Modi यांच्या रॅलीत सहभागी झाल्याने पतीने केले हे | पाहा हा वीडियो | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत सहभाग घेतल्याने एका महिलेला तिच्या पतीने तलाक दिला आहे. फायरा असे या महिलेचे नाव असून दानिश तिच्या पतीचं नाव आहे.दोन दिवसांपूर्वी फरहत नकवी यांनी बरेलीमध्ये एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. रॅली संपल्यानंतर फायरा जेव्हा घरी आली तेव्हा पतीने तिला याबद्दल जाब विचारला. आपण रॅलीत गेल्याचं तिनं पतीला सांगितलं. यावरून दोघांत वाद झाला. चिडलेल्या पतीने फायरा व मुलाला मारहाण केली. त्यानंतर तीन वेळा तलाक म्हणत तिच्याशी काडीमोड घेतला व तिला आणि मुलाला घराबाहेर काढलं.दीड वर्षांपूर्वी फायरा आणि दानिशचा निकाह झाला होता. त्यांना एक मुलगाही झाला. पण काही दिवसांपूर्वी दानिशचे त्याच्या मामीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे फायराला कळले आणि तिला धक्का बसला. यावरून त्यांच्यात वादही झाला. तेव्हापासून त्यांच्यात रोजच खटके उडू लागले. त्यातच फायराने मोदींच्या रॅलीत सहभाग घेतल्याने दानिशला आयतेच कोलीत मिळाले.त्याने त्याच मुद्द्यावरून तिला तलाक दिला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews